कोरोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची भीती; जैविक पदार्थांचे उत्सर्जन होण्याची शक्यता

पुरातन विषाणू सापडल्याने भविष्यात वनस्पती, प्राणी आणि मानवासाठी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे म्हटले आहे. प्रथामिक अहवालांनुसार वातावरण बदलांमुळे बर्फाच्या खाली असलेली उत्तर गोलार्धामधील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच मानवाला संशोधनानिमित्त पोहोचता आले आहे. पहिल्यांदाच या गोठलेल्या विषाणूंशी मानवाशी संबंध आला.

    मॉस्को – रशियामधील (Russia) एका संशोधनादरम्यान फ्रेंच वैज्ञानिकांना (French Scientist) ४८ हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू (Virus) सापडला आहे. रशियामधील एका गोठलेल्या तळ्यामध्ये हा विषाणू सापडला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या विषाणूला ‘झाँबी व्हायरस’ (Zombie Virus) असे म्हटले आहे. या विषाणूमुळे पुन्हा एकदा कोरोनापेक्षाही (Corona) अधिक भयंकर आणि मोठी साथ पसरण्याची भीतीही या वैज्ञानिकांनी व्यक्त केली.

    पुरातन विषाणू सापडल्याने भविष्यात वनस्पती, प्राणी आणि मानवासाठी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे म्हटले आहे. प्रथामिक अहवालांनुसार वातावरण बदलांमुळे बर्फाच्या खाली असलेली उत्तर गोलार्धामधील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच मानवाला संशोधनानिमित्त पोहोचता आले आहे. पहिल्यांदाच या गोठलेल्या विषाणूंशी मानवाशी संबंध आला. मात्र, वातावरण बदलांमुळे मागील हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेल्या या विषाणूंच्या माध्यमातून काही जैविक पदार्थांचं उत्सर्जन होण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्राणघातक विषाणूंचाही समावेश असू शकतो.

    या जैविक घटकांमध्ये पेशी असलेले अतिसूक्ष्म जीव आणि विषाणूंचा समावेश असू शकतो, असाही संशोधकांचा अंदाज आहे. वैज्ञानिकांना हे झाँबी विषाणू सैबेरियन पठारावरील बर्फाच्या चादरीखालील गोठलेल्या तळ्यामध्ये आढळले. साथीचे रोग पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या आणि आतापर्यंत ठाऊक असलेला हा विषाणू ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. अनेकांना बाधित करणारा हा विषाणू संसर्गाच्या लाटेदरम्यान या बर्फाच्या चादरी खाली हजारो वर्षांपासून दाबला गेला. हा आता सध्या मानवाला ठाऊक असलेल्या सर्वात जुन्या विषाणूंपैकी एक ठरला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये सैबिरियातच ३० हजार वर्षांपूर्वीच्या विषाणूचा शोध लागला होता.