मराठी सिनेसृष्टीला कोरोनाचा विळखा, आता ‘या’ अभिनेत्रीला झाला संसर्ग

झी मराठी (Zee Marathi )वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf)यांना कोरोनाची (Corona)लागण झाली आहे. निवेदिता यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरीही त्यांना कोणतीच लक्षणे जाणवत नसल्याने घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान त्यांच्या मालिकेची शूटिंग १५ सप्टेंबरपासून थांबवण्यात आली आहे.

निवेदिता सराफ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यांनतर ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत भूमिका साकारणाऱ्या इतर कलाकारांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या सर्वांच्या कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या या मालिकेची शूटिंग थांबविण्यात आली असून मात्र पुढील दोन दिवसांत शूटिंगला सुरुवात होईल.