‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील या अभिनेत्रीचं कोरोनानं निधन

'ये रिश्ता क्या कहलाता है' या टेलिव्हिजन मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागरचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. ती ३४ वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्याची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती गंभीर होती. त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टेलिव्हिजन मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागरचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. ती ३४ वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्याची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती गंभीर होती. त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर न्युमोनिया झाला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी होत गेली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. दिव्याचं निधन पहाटे ३ वाजता झालं आहे. दिव्याला ७ हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. रात्री अचनाक २ वाजता तिची प्रकृती आणखी खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर ३ वाजता डॉक्टरांनी दिव्याचं निधन झालं असल्याचं जाहीर केलं दिव्या भटनागर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘गुलाबो’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती.

दिव्याची मैत्रीण आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित दिव्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने लिहिलं आहे की, “जेव्हा कोणीच कोणासोबत नव्हतं तेव्हा केवळ तूच असायचीस. दिवु तूच माझी होतीस, जिच्यावर मी रागावू शकत होते, रुसू शकत होते, माझ्या मनातल्या गोष्टी सांगू शकत होते. मला माहित आहे की, आयुष्यात तू खूप अडचणींचा सामना केलास. परंतु, आता मला माहिती आहे की, तू एका चांगल्या ठिकाणी आहे, जिथे दुःख, वेदना, खोटं यांसारखं काहीच नाहीये. तू सदैव स्मरणात राहशील दिवू. आणि तुलादेखील माहित आहे की, तुझ्यावर मी प्रेम करते आणि तुझी काळजी करत होते. मोठी तू होतीस, पण लहानही मुलगीही तूच होतीस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. जिथे कुठे आहेस तिथे आनंदी राहा. तू खूप लवकर निघून गेली मैत्रिणी.”