प्रसिद्ध टीव्ही अभिनेता समीर शर्माची राहत्या घरी आत्महत्या

  • अभिनेता समीर शर्माने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला आहे. घरातील किचनमधील सिलिंगला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. त्याच्या जाण्यान पुर्ण मनोरंजन सृष्टी हळहळ व्यक्त करत आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या धक्क्यातून मनोरंजनसृष्टी सावरली नसताना अणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. ह्या अभिनेत्याचे नाव समीर शर्मा आहे. अभिनेता समीर शर्मा याने मालाडमधील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. समीर शर्मा हा अभिनेता आणि मॉडेल होता. त्याने कहानी घर घर की, क्यू की सांस भी कभी बहू थी, रिश्ता क्या केहलाता है सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 

अभिनेता समीर शर्माने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला आहे. घरातील किचनमधील सिलिंगला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. त्याच्या जाण्यान पुर्ण मनोरंजन सृष्टी हळहळ व्यक्त करत आहे. 

माहितीनुसार, समीर घरातून बाहेर निघाला नव्हता त्यामुळे कोणालाही भेटला नाही. शेजाऱ्यांना घरातून दूर्गंध येऊ लागल्याने त्यांनी सोसायटीच्या कमीटीला सांगितले. तसेच सोसायटीच्या चौकीदाराने पोलीसांना याची माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी जेव्हा घराचा दरवाजा तोडला तेव्हा समीर सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत होता. पोलीसांना तपासाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळाली नाही.