karbhari lay bhari

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती, ‘कारभारी लयभारी'(karbhari lay bhari) या मालिकेच्या प्रोमोची(serial promo). ‘कारभारी लयभारी’  ही मालिका लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोत एका राजकीय पक्षाची सभा आणि त्या सभेला संबोधित करणारा नेता दिसत आहे. भर पावसात एक नेता सभेला संबोधित करत आहे. ‘अरे ही माणसं आमची आहेत. हा महाराष्ट्र आमचा आहे. मग सत्ता पण आमची. आम्ही का जायचं त्यांच्या दारात; ते येतील आमच्या दारी. आम्ही इथले कारभारी…. ‘ असे या भाषणातील बोल आहे.

यात अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे आहेत का? असा सवाल देखील सोशल मीडियावर विचारला जात आहे तर काहींनी अभिनेता राजेश श्रुंगारपुरे असल्याचे म्हटले आहे. ‘कारभारी लयभारी’ या मालिकेचा हा पहिलाच प्रोमो आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता तर ताणलीच आहे. पण तुर्तास आपण दुसऱ्या प्रोमोची वाट पाहूया.