kedar shinde

सर्वसामान्य कुटुंबाची गोष्ट सांगणारी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका आजही प्रेक्षक विसरू शकले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या सहजसुंदर मालिकेच्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. गेले काही दिवस केदार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जुन्या गोष्टींचे फोटो अपलोड करून, त्या गोष्टी आपल्या सामान्यांच्या आठवणीत कशा राहिल्या आहेत याबद्दल लिहीत होता. या पोस्टवरून लवकर तो काहीतरी नवीन घेऊन येत आहे याची चाहूल काही चाणाक्ष प्रेक्षकांना लागली होती.

लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे(kedar shinde) आता ‘सुखी माणसाचा सदरा’(sukhi mansacha sadara) ही टीव्ही मालिका(tv serial मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात अभिनेता भरत जाधव(bharat jadhav) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि श्रुजा प्रभुदेसाई या मालिकेमध्ये चमकणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात अनेक नवनवीन वेबसिरीज, मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. काही मालिकांमधून नवनवीन विषय हाताळले जात असताना, एका साध्या, सर्वसामान्य माणसाची गोष्ट सांगणारी मालिका केदार शिंदे घेऊन येत आहे.

 

View this post on Instagram

 

तासांचे पैसे देऊन “सायकल” चालवण्याची औरच मजा होती. मधेच चेन निसटल्यानंतर काळे हात करून घेण्याचे ते दिवस! आत्ता गाड्या घोडे आले तरी, तेव्हा “घोडा सायकल” असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं. ही जगण्यातली श्रीमंती जागविण्यासाठी TV वर मालिका आणतोय. तपशील उद्याचं! श्री स्वामी समर्थ.

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

सर्वसामान्य कुटुंबाची गोष्ट सांगणारी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका आजही प्रेक्षक विसरू शकले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या सहजसुंदर मालिकेच्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. गेले काही दिवस केदार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जुन्या गोष्टींचे फोटो अपलोड करून, त्या गोष्टी आपल्या सामान्यांच्या आठवणीत कशा राहिल्या आहेत याबद्दल लिहीत होता. या पोस्टवरून लवकर तो काहीतरी नवीन घेऊन येत आहे याची चाहूल काही चाणाक्ष प्रेक्षकांना लागली होती. नवीन मालिका घेऊन येत असल्याचे कळल्यावर, ही मालिका कोणत्या विषयावर आहे? त्यात कलाकार कोण आहेत? ती कधीपासून सुरू होणार आहे? अशा अनेक प्रश्नांनी केदारचं सोशल मीडिया अकाऊंट भरलं होतं. या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून त्याने त्याच्या नवीन मालिकेविषयी सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

नवी सुरूवात…. श्री स्वामी समर्थ.

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेतून केदार पुन्हा एकदा टीव्ही क्षेत्रात पुनरागमन करत असून, येत्या दसऱ्याला मालिकेचा शुभारंभ होणार आहे. प्रवाहाच्या विरुद्ध चालायला मी सुरुवात करतो आहे. आपल्या सगळ्यांची, सर्वसामान्यांची गोष्ट घेऊन मी येत आहे. माझा रसिकांवर फार विश्वास आहे. त्यांनी या अगोदरसुद्धा आम्हाला भरभरून प्रेम दिले. आताही ते अनुभवायला मिळेल अशी आशा आहे. आज जे सगळे टीव्हीवर सुरू आहे, त्याच्याविरुद्ध मी करतो आहे. प्रेक्षकांनी साथ दिली, तर पुन्हा एकदा विक्रम होईल हे निश्चित,असे केदार शिंदे याने म्हटले आहे.