सोशल मीडियावर मिळणाऱ्या धमक्यांविरोधात, देशभरातील अनेकांनी एकता कपूरला दिले समर्थन

निर्माता एकता कपूरला वेबमालिकेतील काही संदिग्ध दृश्यांबाबत सोशल मीडियावरून बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. वेब मालिकेतील ती दृश्ये हटवण्यात आल्यानंतर देखील धमक्या सुरूच

 निर्माता एकता कपूरला वेबमालिकेतील काही संदिग्ध दृश्यांबाबत सोशल मीडियावरून बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. वेब मालिकेतील ती दृश्ये हटवण्यात आल्यानंतर देखील धमक्या सुरूच आहेत. एखाद्या महिलेला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत असून त्यासंदर्भात वापरण्यात आलेले अपशब्द तसेच धमक्यांच्या विरोधात, एकता कपूरला सर्व स्तरातून महिलांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. 

एखाद्या महिलेला बलात्काराची धमकी देण्याच्या हीन वृत्तीवर देखील प्रश्न उठवले जात असून काहींनी पोलिसांना संपर्क करून महिला सेलला परिस्थितिमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. एकता कपूरला सोशल मीडियावर धमकवण्याबाबत सर्वच स्तरातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. काहींनी यातील तथ्यांच्या आधारे, जेव्हा की ती दृश्य आधीच हटवण्यात आलेली असताना अशा तऱ्हेने धमकावण्यावर निषेध व्यक्त केला आहे. 

एकाने ट्विटरवर म्हटले आहे की,  मुंबई पोलीसांनी यात लक्ष घालून गुन्हेगारांना शिक्षा दिली पाहीजे. एकता कपूर सारख्या निर्मातीच्या बाबतीत असे घडणे योग्य नाही. आणखी एकाने लिहीले आहे की, ते एकता कपूरच्या नग्न छायाचित्रांचे वितरण सगळीकडे करण्याची मागणी करत आहेत. ते देशभक्त आहेत म्हणून असं करत नाहीयेत. तर त्यांना एका स्वतंत्र महिलेला तिची जागा दाखवायची आहे. उद्या ते असं कोणाच्याही बाबतीत करू शकतात.