rj malishka

झी मराठी(zee marathi) वाहिनीवर नवा शो सुरु होणार आहे. हा नवा डान्सिंग रिअॅलिटी शो(dancing reality show) २४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या शो चे नाव ‘डान्सिंग क्वीन- साईज लार्ज फुल चार्ज’ असे आहे. या शो मध्ये १५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या  मुली आणि महिला स्पर्धक असणार आहेत. या शो चे वेगळेपण म्हणजे ज्यांचे वजन ७० किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे स्पर्धक या शोमध्ये घेण्यात आले आहेत.

या शोसाठी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अद्वैत दादरकर सूत्रसंचालन करणार आहे. तसेच परीक्षक म्हणून सोनाली कुलकर्णी आणि आरजे मलिष्का (rj malishka) काम पाहणार आहेत. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार शिंदेकडे देण्यात आली आहे.

डान्सिंग क्वीन या शोच्या माध्यमातून मलिष्का पहिल्यांदाच परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा शो २४ सप्टेंबरपासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता दाखवला जाणार आहे.