Tarak Mehta's inverted glasses; Mercy of Corona to Veera Sundar of Daya Ben

मुंबईतील शूटिंग संपवून मयूर वाकानी अहमदाबादला परतल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. मयूरला दोन दिवसांपासून ताप येत होता. म्हणून त्याने कोरोना टेस्ट करुन घेतली. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. अहमदाबादच्या रुग्णालयात तो उपचारासाठी दाखल झाला आहे.

    मुंबई : देशात पून्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. बॉलीवुडसह टी व्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सुंदरलाल’ची भूमिका साकारणार्‍या मयूर वाकानी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

    मुंबईतील शूटिंग संपवून मयूर वाकानी अहमदाबादला परतल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. मयूरला दोन दिवसांपासून ताप येत होता. म्हणून त्याने कोरोना टेस्ट करुन घेतली. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. अहमदाबादच्या रुग्णालयात तो उपचारासाठी दाखल झाला आहे.

    दरम्यान, दया आणि सुंदरलाल अर्थात दिशा-मयूर खरेखुरे भाऊ-बहिण आहेत. दिशाने तिच्या प्रेग्नन्सीमुळे २०१७ मध्ये शोमधून ब्रेक घेतला. चार वर्षे उलटून गेली, तरीही प्रेक्षक आतुरतेने दया बेन परत येण्याची वाट पाहत आहेत.