कल्याण डोंबिवली पालिकेला कोरोना लढ्यासाठी शासन १० कोटींचा निधी देणार – पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना साथीचा वाढत्‍या प्रादुर्भावाला अटकाव करण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍न करीत आहे. ठाणे जिल्‍हा पालकमंत्री नामदार एकनाथ

कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना साथीचा वाढत्‍या प्रादुर्भावाला अटकाव करण्‍यासाठी महापालिका  प्रयत्‍न करीत आहे. ठाणे जिल्‍हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच कोरोना साथीच्‍या प्रतिबंधासाठी महापालिकेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन यापूर्वीच दिले आहे. कोरोना साथीच्‍या मुकाबल्‍यासाठी पालकमंत्री यांनी शासनाकडे सातत्‍याने पाठपुरावा करुन कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासाठी रु. १० कोटी निधी मंजूर करुन घेतला आहे. सध्‍याच्‍या आपत्‍कालीन परिस्थितीत कोरोना साथीवर करावयाच्‍या विविध उपाययोजनांसाठी महापालिकेस निधीची नितांत गरज असल्‍याने राज्‍य शासनामार्फत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेस मिळवून दिलेल्‍या अर्थसहायामुळे महापौर विनिता राणे, आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पा‍लकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.