वॉर रेस्क्यु फाऊंडेशनने १० फुटी अजगराला दिले जीवदान

कल्याण : लॉकडाऊन काळात परिसर निर्मनुष्य झाल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मनुष्यवस्तीत आलेल्या तब्बल १० फुटी अजगराला वाचवण्यात वॉर रेस्क्यू फाऊंडेशनला यश आले आहे. कल्याण पूर्वेतील कल्याण-अंबरनाथ

कल्याण : लॉकडाऊन काळात परिसर निर्मनुष्य झाल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मनुष्यवस्तीत आलेल्या तब्बल १० फुटी अजगराला वाचवण्यात वॉर रेस्क्यू फाऊंडेशनला यश आले आहे. कल्याण पूर्वेतील कल्याण-अंबरनाथ मार्गावर चिंचोली नावाचे गाव आहे. या गावात हा अजगर अन्न-पाण्याच्या शोधात आला होता. वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे स्वयंसेवक आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत मुरलीधर जाधव यांच्या प्रयत्नांनी या दहा फुटी मादी अजगराला वाचविण्यात सर्पमित्रांना यश आले. हा अजगर कल्याण वनविभागांचे वनपाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र योगेश कांबळे, दत्ता बोंबे, सुहास पवार, हितेश करंजगावकर, गणेश खंडागळे, अभिषेक एडके देखरेख करत आहेत. तसेच या अजगराची प्राथमिक तपासणी करून त्याला निसर्गरम्य वातावरणात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डगळे यांनी सांगितले.