उल्हासनगरमधील १०० डेज ऑर्केस्ट्रा बार सील, महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; कोरोना नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

इथे कोरोना नियमांचे सर्रास पणे उल्लंघन करून शनिवारी मध्यरात्री पर्यंत हे ऑर्केष्ट्रा बार सुरू होते, त्यामुळे विठ्ठलवाडी पोलिसांनी इथे धाड टाकीत बारची पाहणी केली.

    उल्हासनगर : राज्य शासनाने रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले असतांना त्याचे पालन न करणारे उल्हासनगरमधील एक ऑर्केस्ट्रा बार सील करण्यात आले आहे.

    उल्हासनगर महापालिका आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.श्रीराम चौकात असलेले १०० डेज हे ऑर्केस्ट्रा बार आहे. इथे कोरोना नियमांचे सर्रास पणे उल्लंघन करून शनिवारी मध्यरात्री पर्यंत हे ऑर्केष्ट्रा बार सुरू होते, त्यामुळे विठ्ठलवाडी पोलिसांनी इथे धाड टाकीत बारची पाहणी केली. दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी हा बार सील केला आहे तर दुसरीकडे राज्य शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन नागरिक आणि व्यापाऱ्यांनी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.