कल्याण डोंबिवलीमध्ये १०६ कोरोना रुग्णांची नोंद, ७७ जण कोरोनामुक्त

आज नोंद झालेल्या १०६ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार १६४ झाली आहे. यामध्ये १०७१ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ८७५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Domivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १०६ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे आज २ मृत्यू झाले आहेत.

    आज नोंद झालेल्या १०६ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार १६४ झाली आहे. यामध्ये १०७१ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ८७५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१७, कल्याण प – २९, डोंबिवली पूर्व – ३१, डोंबिवली पश्चिम – २३, मांडा टिटवाळा – २, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.