कल्याण डोंबिवलीमध्ये १०६ कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

आज नोंद झालेल्या १०६ रूग्णांमुळे(Corona Patients) कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali)पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ६९ झाली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १०६ कोरोना रुग्णांची(Corona Patients Update) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ८३ रुग्णांना डिस्चार्ज(Discharge) देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू(Death By Corona) झाला आहे.

    आज नोंद झालेल्या १०६ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ६९ झाली आहे. यामध्ये ९७९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३४ हजार ८५० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२४, कल्याण प – ३२, डोंबिवली पूर्व – २१, डोंबिवली पश्चिम – १७, मांडा टिटवाळा – ५, तर मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.