प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • ५७,१७३ एकूण रुग्ण तर १०९७ जणांचा आतापर्यंत मृत्यू

कल्याण (Kalyan).  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या १०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,१७३ झाली आहे. यामध्ये ११०० रुग्ण उपचार घेत असून ५४,९७६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६, कल्याण प.– २८, डोंबिवली पूर्व –३८, डोंबिवली प – १६, मांडा टिटवाळा -८, तर मोहना येथील १ रूग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.