ulhas nadi oti

राजमाची डोंगरावरून खाली येत कर्जत(Karjat), बदलापूर(Badlapur), अंबरनाथ(Ambernath) आणि कल्याण(Kalyan) या मार्गे समुद्रास मिळणारी बाराही महिने जवळपास लाखो लोकांना मुबलक पाणी देण्याचं काम अविरतपणे करणारी उमाई(Ulhas River Polluted) आज प्रदूषित होत चालली आहे.

  कल्याण : उल्हास नदीला(Ulhas River) ११ रंगीत साड्या(Sarees) समर्पित करीत महिला व उल्हास नदी बचाव समितीने उमाईची अनोखी ओटी (Sarees Given To Ulhas River)भरली आहे. उल्हास नदी बचाव कृती समिती व वालधुनी बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम रविवारी रायते ब्रिज पांजरापोळ या ठिकाणी पार पडला.

  saree for river

  राजमाची डोंगरावरून खाली येत कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याण या मार्गे समुद्रास मिळणारी बाराही महिने जवळपास लाखो लोकांना मुबलक पाणी देण्याचं काम अविरतपणे करणारी उमाई आज प्रदूषित होत चालली आहे. अतिक्रमण, सांडपाणी, कारखान्याताल रसायन व घरगुती टाकाऊ वस्तू यामुळे आज उल्हास नदी नाल्यात रूपांतरित होत आहे. प्रदूषित झालेली उल्हास नदी जलपर्णी रूपी हिरवे विनाशकारी पांघरूण घालण्यास हतबल झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात नदी रौद्ररूप धारण करून मानवाने केलेल्या चुकांचा हिशोब पुराच्या रूपात घेत असते.

  woman of kalyan

  नदी म्हणजे आई आणि या उमाईची ओटी भरून झालेल्या चुकांची माफी मागून तिच्या स्वच्छ व सुंदरता अबाधित राहिल यासाठी आम्ही उमाई पुत्र म्हणून तिची सतत प्रयत्न करू अशी शपथ घेऊन रंगीबेरंगी अकरा साड्या अर्पण करून तिची ओटी भरून पुजा केली गेली.

  या अर्पण केलेल्या अकरा साड्या याच नदीच्या बाजूला राहणाऱ्या गरजू महिलांना भेट म्हणून देऊन उल्हास नदी प्रदूषित न करण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमासाठी नीलपर्ल फाऊंडेशन द्वारा अकरा साड्यांची भेट देण्यात आली.