कल्याण डोंबिवलीमध्ये ११४ रुग्णांची भर, १२८ जण झाले कोरोनामुक्त

आज नोंद झालेल्या ११४ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली(Kalyan Domivali) पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ७९ झाली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Domivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ११४ कोरोना रुग्णांची (Corona Patients)नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २ मृत्यू झाले आहेत.

    आज नोंद झालेल्या ११४ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली(Kalyan Domivali) पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ७९ झाली आहे. यामध्ये ११९२ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३३ हजार ६५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -१४, कल्याण प – २६, डोंबिवली पूर्व – ५३, डोंबिवली पश्चिम – १८, तर मांडा टिटवाळा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.