कल्याण डोंबिवलीत ११५ नवे रुग्ण, २० जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवलीत(Kalyan Dombivali) आज ११५ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ११५ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २० मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या ११५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार १६० झाली आहे. यामध्ये १८६१ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार २७४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २०२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८, कल्याण प – ४३, डोंबिवली पूर्व- ३०, डोंबिवली प – १७, मांडा टिटवाळा – ६, तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.