corona

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १२० कोरोना(corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १२० कोरोना(corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या १२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,१६० झाली आहे. यामध्ये १६८२ रुग्ण उपचार घेत असून ५१,४१७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २७, कल्याण प – ३७, डोंबिवली पूर्व – ३१, डोंबिवली प – १३, मांडा टिटवाळा – ६, तर मोहना येथील ६ रूग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून तसेच ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.