कल्याण डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत कोरोनाने घेतला १२०० जणांचा बळी, ७११ नव्या रुग्णांची नोंद

कोरोनाचा कहर सगळीकडे वाढताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण १२०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू(corona patients death in kalyan dombivali) झाला आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण १२०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू(corona patients death in kalyan dombivali) झाला आहे. आज सर्वाधिक तब्बल ७११ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या ७११ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७१,९४० झाली आहे. यामध्ये ५४५९ रुग्ण उपचार घेत असून ६५,२८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७११ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११६, कल्याण प – २६४, डोंबिवली पूर्व –२३०, डोंबिवली प – ६४, मांडा टिटवाळा – ३१, तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.