कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसभरात १३३ नव्या रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३३ कोरोना रुग्णांची (Corona Patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३३ कोरोना रुग्णांची (Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १३३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ९७३ झाली आहे. यामध्ये १०९६ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ६६२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२१, कल्याण प – ३३, डोंबिवली पूर्व – ४३, डोंबिवली पश्चिम – २१, मांडा टिटवाळा – ११, मोहना – २ तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.