कल्याण डोंबिवलीमध्ये १३५ नवे रुग्ण, दोघांचा कोरोनाने घेतला बळी

आज कल्याण डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivali)नोंद झालेल्या १३५ रूग्णांमुळे(Corona Update) पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ८७० झाली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३५ कोरोना रुग्णांची नोंद(Corona Patients) करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले आहेत.

    आज कल्याण डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivali)नोंद झालेल्या १३५ रूग्णांमुळे(Corona Update) पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ८७० झाली आहे. यामध्ये ११८५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३३ हजार ४५६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३१, कल्याण प- २३, डोंबिवली पूर्व – ५५, डोंबिवली पश्चिम – १९, मांडा टिटवाळा – ६, तर मोहना येथील १ रुग्णाचा समावेश आहे.