कल्याण डोंबिवलीमध्ये १३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २२ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३६ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण: कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १३६ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आज २२ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार २९६ झाली आहे. यामध्ये १७९५ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ४५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २०४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२२, कल्याण प- ३७, डोंबिवली पूर्व – ३९, डोंबिवली प – २३, मांडा टिटवाळा – १२, तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.