कल्याण डोंबिवलीमध्ये १३७ नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३७ कोरोना रुग्णांची(kalyan dombivali corona update) नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३७ कोरोना रुग्णांची(kalyan dombivali corona update) नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या १३७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,२९७ झाली आहे. यामध्ये १६७० रुग्ण उपचार घेत असून ५१,६५६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २६, कल्याण प – ५२, डोंबिवली पूर्व –२८, डोंबिवली प – २२, मांडा टिटवाळा – ५, तर मोहना येथील ४ रूग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.