कल्याण डोंबिवलीमध्ये १३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद,२२ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका(Kalyan Dombivali) क्षेत्रात आज १३९ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका(Kalyan Dombivali) क्षेत्रात आज १३९ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २२ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १३९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार ६४६ झाली आहे. यामध्ये १७९९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ७५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत २०९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०, कल्याण प- ४३, डोंबिवली पूर्व – ४६, डोंबिवली प – २६, तर मांडा टिटवाळा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.