कल्याण डोंबिवलीमध्ये १४१ नवे कोरोना रुग्ण, ६५ जण कोरोनामुक्त

आज नोंद झालेल्या १४१ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली(KalyanDombivali) पालिका क्षेत्रातील रुग्णांची(Corona Update) एकूण संख्या १ लाख ३७ हजार ४६३ झाली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १४१ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.

    आज नोंद झालेल्या १४१ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ४६३ झाली आहे. यामध्ये १२०३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३४ हजार २६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत २२३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१४, कल्याण प – ३०, डोंबिवली पूर्व – ५१, डोंबिवली पश्चिम – २५, मांडा टिटवाळा – ११, मोहना – ८, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.