कल्याण डोंबिवलीमध्ये १४९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २० जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली(Corona Patients in Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १४९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Corona Patients in Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १४९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २० मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १४९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३३ हजार ७९५ झाली आहे. यामध्ये १७४४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख २९ हजार ९३८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६, कल्याण प -४०, डोंबिवली पूर्व- ४८, डोंबिवली प – २४, मांडा टिटवाळा – ९, मोहना -१, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.