Corona-Virus-Latest-Update

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५९ कोरोना(corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या १५९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४९,५८० झाली आहे. यामध्ये १७५७ रुग्ण उपचार घेत असून ४७,०१९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३५, कल्याण प – ३६, डोंबिवली पूर्व ४८, डोंबिवली प- २३, मांडा टिटवाळा – १०, तर मोहना येथील ४ रूग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३१ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथून, पाटीदार भवन येथून ४ रुग्ण, तर शास्त्री नगर रुग्णालयातून १ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.