तब्बल २० तासानंतर सापडला त्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह, रुंदे नदीपात्रात होता तरंगत

टिटवाळ्या (Titwala)नजीक रूंदे नदीपात्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासानंतर(Dead Body Found After 20 hours) सापडला आहे.

    कल्याण : टिटवाळ्या (Titwala)नजीक रूंदे नदीपात्रात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा बुडल्याची(Boy Drowning In River) दुर्दैवी घटना रविवारी घडली. या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासानंतर(Dead Body Found After 20 hours) सापडला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा घोटसई रोड ऐ टी नगर परिसरात राहणारा गणेश शेरखाने हा वडिल तसेच १० वर्षीय दोन मुले ८ वर्षीय दोन मुली यांच्या सह आंघोळीसाठी रुंदा नदी येथे ११.३० च्या सुमारास आले असता वडील शिवसाईनगर रूंदे येथील रूमच्या डागडुजी कामासाठी गेले असता दुपारी दीडच्या सुमारास परत आल्यानंतर इतर लहान मुले काठावर बसलेली आढळली. गणेश हा १६ वर्षीय मुलगा पाण्यात बुडला असावा याबाबत टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली.

    टिटवाळा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शोध नदीपात्रात कार्य सुरू केले. अग्निशमन विभागाने शोधमोहीम सुरू केली. अंधारात शोधकार्य करणे अवघड झाल्यामुळे कार्यवाही थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी ८ वा. सुमारास गुरवली परिसरात नदीपत्रात तब्बल २० तासानंतर गणेशचा मृतदेह पाण्यात तंरगताना आढळला. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढुन शवविच्छेदनसाठी रूग्णालयात पाठविला असल्याची माहिती फायर ऑफिसर सुधीर दुशिंग यांनी दिली.