16-year-old girl drowns in Dombivli mine

खेळता खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही गीताने पाण्यात उडी घेतली. परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठा हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला. पण दुर्दैवाने ती पाण्यात बुडाली.

डोंबिवली : पाण्यात बुडणारी लहान बहिण आणि आईला तिने वाचवले मात्र, यांना वाचवताना तिचा जीव गेल्याची दुख:द घटना रविवारी डोंबिवलीत घडली आहे.

लावण्या (वय १६ वर्ष) असं मृत मुलीचे नाव आहे. डोंबिवली जवळील हेदुटणे गावाजवळ रविवारी दुपारी ही घटना घडली.
मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता आपल्या दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेली होती.

खेळता खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही गीताने पाण्यात उडी घेतली. परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठा हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला. पण दुर्दैवाने ती पाण्यात बुडाली.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली. रात्रीच्या वेळेस अंधारामुळे लावण्याचा शोध लागला नाही. मात्र, रविवारी सकाळी लावण्याचा मृतदेह सापडला.