कल्याण डोंबिवलीमध्ये १७२ नव्या कोरोना रुग्णांची भर, ४१ जण कोरोनामुक्त

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १७२ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १७२ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ६ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४२० झाली आहे. यामध्ये १७०३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ५३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२३, कल्याण प-५२, डोंबिवली पूर्व – ५५, डोंबिवली प -२०, मांडा टिटवाळा – १७ तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.