भिवंडीत १९ नवे रुग्ण आढळले

भिवंडी: निसर्गचक्री वादळाने बुधवारी राज्यात हाहाकार माजवला असून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत आज देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिवंडी शहरात १२ तर ग्रामीण भागात ७ असे १९ नवे रुग्ण आढळले

भिवंडी:  निसर्गचक्री वादळाने बुधवारी राज्यात हाहाकार माजवला असून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत आज देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिवंडी शहरात १२ तर ग्रामीण भागात ७ असे १९ नवे रुग्ण आढळले आहेत. या १९ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३२१ वर पोहचला आहे. 

भिवंडी शहरात बुधवारी १२ नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत शहरात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील बाधीत रुग्णांचा आकडा १९७ वर पोहचला असून ८० रुग्ण बरे झाले असून १०६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 

तर ग्रामीण भागात बुधवारी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २ , दिवा अंजुर येथे ४ तर अनगाव येथे एक असे ७ नवे रुग्ण आढळले आहेत. या ७ नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १२४ वर पोहचला असून त्यापैकी ५८ रुग्ण बरे झाले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ६३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता ३२१ वर पोहचला असून त्यापैकी १३८ रुग्ण बरे झाले आहेत तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.