गडचिंचले प्रकरणातील कोरोनाबाधित आरोपीच्या सहवासातील १९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

वाडा: गड चिंचले प्रकरणातील एका आरोपीला कोरोना लागण झाली होती. या आरोपीच्या संपर्कातील १९ जणांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.तर काही जणांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची

 वाडा: गड चिंचले प्रकरणातील एका आरोपीला कोरोना लागण झाली होती. या आरोपीच्या संपर्कातील १९ जणांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.तर काही जणांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिस ठाण्यात गडचिंचले प्रकरणातील काही आरोपी हे वाडा पोलीस ठाण्यातील एका कोठडीत ठेवण्यात आले होते.यात 
एका आरोपीला कोरोना लागण झाली होती. त्याला उपचारासाठी. पालघर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. यात त्याच्या सहवासातील पोलीस आणि आरोपी असे एकूण ६८ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज त्यातील काही जणांचे रिपोर्ट आले. या कोरोना बाधीत आरोपीच्या संपर्कातील काही जणांचे रिपोर्ट  निगेटिव्ह आल्याची माहिती वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बुरपले यांनीही दिली. इतर रिपोर्ट येणे बाकी आहे असे त्यांनी सांगितले. वाडा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेल्या ५५ वर्षीय आरोपीला कोरोनाची झाली होती. आणि वाडा तालुक्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नव्हता त्यामुळे येथे चिंतेत भर पडलीहोती.या प्रकरणात ४५ पोलीस कर्मचारी व २३ आरोपी असे एकुण ६८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. १९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले.आणि ७ मे पर्यंत वाडा शहर बंद ठेवण्याची कार्यवाही इथल्या प्रशासनाने हाती घेतली होती. कोरोनाबाधित आरोपीच्या जास्त संपर्कात आलेल्या लोकांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने जरा दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.