कल्याण डोंबिवलीमध्ये १९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १०२ जणांना मिळाला डिस्चार्ज

आजच्या १९९ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) पालिका क्षेत्रातील रुग्णांची(Corona Patients) एकूण संख्या १ लाख ३६ हजार ७३५ झाली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज १९९ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १९९ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ७३५ झाली आहे. यामध्ये ११२२ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३३ हजार ३८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १९९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प- ४३, डोंबिवली पूर्व- ८४, डोंबिवली पश्चिम – ५३, मांडा टिटवाळा – ४, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.