cobra in navi mumbai

नवी मुंबई: सीबीडी बेलापूर सेक्टर ८ येथील दुर्गामाता परिसरात आज कोब्रा जातीचे दोन साप(cobra found in belapur) रहिवाशी भागात आढळून आले. नवी मुंबई पालिकेचे कर्मचारी काम करताना त्यांना साप नजरेस पडताच एकच खळबळ उडाली. तातडीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुनर्वसू या सर्पमित्र संस्थेशी संपर्क साधला. तोपर्यंत परिसरात बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

पुनर्वसू संस्थेचे भरत पुजारी व अष्टविनायक मोरे यांनी तातडीने धाव घेतली. मोठ्या शिताफीने या कोब्रा जातीच्या सापांना जेरबंद केले. स्थानिकांना या सापाबाबत माहिती देत साप हा निसर्ग चक्रातील महत्वाचा घटक असल्याचे समजावून संगितले. या दोन्ही कोब्रा जातीच्या सापांची सेक्टर ८ येथील ग्रीन व्हॅली येथे सुखरूप मुक्तता करण्यात आली.