भिवंडीत २० ऑक्सीजन कंसंट्रेटर यंत्र उपलब्ध

भिवंडी : ऑक्सीजन न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याने त्या बाबत वरिष्ठ पातळीवर सुध्दा तक्रार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर

भिवंडी : ऑक्सीजन न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याने त्या बाबत वरिष्ठ पातळीवर सुध्दा तक्रार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर  महानगरपालिकेने २० ऑक्सीजन कंसंट्रेटर यंत्र उपलब्ध केले असून विजेवर चालणाऱ्या या यंत्राद्वारे वातावरणातील ऑक्सीजन खेचून यंत्राद्वारे रुग्णांना पुरविले जाणार असून त्यासाठी वेगळ्या ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता नसल्याची महिती कोव्हिडं केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ मिलिंद भोईर यांनी दिली आहे.         

हे यंत्र विजेवर चालणारे असून ते हाताळण्यास सोपे असल्याने सध्या रईस उर्दू हायस्कुल ,ओसवाल हॉल या ठिकाणी प्रत्येकी ५ व आयजीएम रुग्णालय या ठिकाणी १० संच उपलब्ध झाले असून त्यामुळे यापुढे ऑक्सीजन न मिळाल्याच्या तक्रारीं वर अंकुश बसून रुग्ण मृत्यू दर घटविण्यात मदत होणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने  दिली आहे.