कल्याण डोंबिवलीत २४ तासात २०८ नव्या रुग्णांची नोंद, एकूण ४७,३५७ रुग्ण तर ९३९ जणांचा आतापर्यंत मृत्यू

आजच्या या २०८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४७,३५७ झाली आहे. यामध्ये ३००२ रुग्ण उपचार घेत असून ४३,४१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३५, कल्याण प – ७८, डोंबिवली पूर्व ४९, डोंबिवली प- ३०, मांडा टिटवाळा – ५, तर मोहना येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali ) क्षेत्रात आज नव्या २०८ कोरोना रुग्णांची (Kalyan Dombivali Corona patients)नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या २०८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४७,३५७ झाली आहे. यामध्ये ३००२ रुग्ण उपचार घेत असून ४३,४१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३५, कल्याण प – ७८, डोंबिवली पूर्व ४९, डोंबिवली प- ३०, मांडा टिटवाळा – ५, तर मोहना येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६५ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.