drug seized in kalyan

कोणार्क एक्सप्रेसच्या (Konark Express) डी २ बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किमतीचा २१ किलो  अंमली पदार्थ(21 Kilogram Drugs Seized In Konark Express By Kalyan RPF) कल्याण आरपीएफने जप्त केला आहे.

    कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात(Kalyan Railway Station) शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या (Konark Express) डी २ बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किमतीचा २१ किलो  अंमली पदार्थ(21 Kilogram Drugs Seized In Konark Express By Kalyan RPF) कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. हे अंमली पदार्थ (गांजा) नार्कोटीक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे, याचा तपास सुरू आहे.

    शुक्रवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटाच्या वाजण्याच्या सुमारास उडीसाहून कल्याण स्थानकात येत असलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी २ बोगीतील एका सीटखाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफला सूचना देण्यात आल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कल्याण आरपीएफचे स्टेशन प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमने कोणार्क एक्सप्रेस रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आरपीएफने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेसची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी केली असता सीट खाली लाल रंगाची ट्रॉली बॅग आणि काळ्या रंगाची सॅग बॅग आढळून आली.