ठाणे जिल्हयात कोरोनाचे २१७३ नवे रूग्ण; १० जणांचा मृत्यू

ठाणे जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच सोमवारी कोरोनाचे २१७३ नवीन रूग्ण आढळून आले असून १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्हयात २ लाख ९० हजार ६१६ रूग्णांची नोंद झाली.

    ठाणे (Thane).  जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच सोमवारी कोरोनाचे २१७३ नवीन रूग्ण आढळून आले असून १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्हयात २ लाख ९० हजार ६१६ रूग्णांची नोंद झाली. असून, त्यापैकी २ लाख ६७ हजार ६७४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्हयात ६३९२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात सध्या १६ हजार ५५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रूग्ण संख्येबरेाबरच मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त हेात आहे.

    ठाणे महापालिका क्षेत्रात ५९० रूग्णांची नोंद झाली असून ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ठाण्यात ४५७५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोना रूग्णांचा आकडा ६९४४२ वर पेाहचला असून, १४२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केडीएमसीत ६८६ रूग्ण आढळून आले असून, २ रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. सध्या ५१५५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंतची रूग्ण संख्या ७१२६० असून, १२२८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिकेत ४०४ रूग्ण आढळून आले असून, एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३०२२ अॅक्टीव्ह रूग्ण असून ११५० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंची रूग्ण संख्या ६० हजारावर पोहचली आहे.

    उल्हासनगरमध्ये ५१ रूग्णांची नोंद झाली असून सध्या ६९९ रूग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंतच्या रूग्णांची संख्या १२७३५ आहे. तर ३७४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५९० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. भिवंडीत ३९ रूग्ण आढळून आले असून, एकही मृत्यू नाही. सध्या २४७ रूग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत ७१६३ रूग्णांची नोंद झाली असून ३५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मीरा भाईंदरमध्ये १३१ रूग्ण आढळून आले असून, एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २८ ७४८ रूग्णांची नोंद झाली असून, ८११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११५३ रूग्णांवर उपचार सुरू आहे.

    अंबरनाथमध्ये ९६ नवीन रूग्णांची नेांद झाली असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंतच्या कोरोना रूग्णांचा आकडा ९५८६ वर पोहचला असून ३१६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७०० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये ११२ रूग्ण आढळून आले असून आतापर्यंत १११४० रूग्णांची नोंद झाली आहे तर १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७९ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच ठाणे ग्रामीण परिसरात ६४ रूग्ण आढळून आले असून दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०४२२ रूग्णांची नोंद झाली असून ६०२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६२० रूग्णांवर उपचार सुरू आहे.