पनवेल तालुक्यात २७८ नवीन रुग्ण ३  मृत्यू; १८८  रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी: पनवेल तालुक्यात रविवारी  (दि.३० ) कोरोनाचे २७८  नवीन रुग्ण आढळले असून ३ जणांचा  मृत्यू  झाला आहे तर १८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात २१८  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर १२६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये ६० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात २१८  नवीन रुग्ण आढळले.  पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती सोसायटीतील एका  व्यक्तीचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे. रविवार आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत २९ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या २०१९ झाली आहे. कामोठेमध्ये २३ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या २४६७  झाली आहे. खारघरमध्ये ३९ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या २३३९  झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये ५४  नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या २१५६ झाली आहे. पनवेलमध्ये ७२  नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या २०६२   झाली आहे. तळोजामध्ये १ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या ६०९ झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण ११६५२ रुग्ण झाले असून १००८३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५३ टक्के आहे. १२८७  रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २८२  जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ६०  रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये उलवे १९ , करंजाडे ८,सुकापूर ७ ,विचुंबे ३,आदई ३ , पळस्पे २, साई २, भाताण २, नारपोली , उसर्ली , न्हावा , कोपर- गव्हाण , हरिग्राम , डेरवली , भोकरपाडा , वावेघर , वलप , शेडुंग , सावळे ,सागुर्ली आणि आकुरली येथे प्रत्येकी एक कोरोंनाचा रुग्ण आढळला आहे. आज विचुंबे आणि गिरवले येथील दोघांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे तर ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.पनवेल ग्रामीणमध्ये आज पर्यंत  कोरोंना पोझिटिव्हची संख्या ३४८३ झाली असून २९४९  जणांनी कोरोंनावर मात केली असून ६९  जणांचा मृत्यू झाला आहे