कोरोनानंतर वाढतोय म्युकरमायकोसिसचा विळखा, नवी मुंबईत आढळले २९ रुग्ण – ४ जणांचा मृत्यू

नवी मुंबईत(Navi Mumbai) म्युकरमायकोसिसचे(Mucormycosis) २९ रुग्ण आढळले आहेत.

    नवी मुंबई: नवी मुंबईत(Navi Mumbai) म्युकरमायकोसिसचे(mucormycosis) २९ रुग्ण आढळले आहेत. यात तेरणा हॉस्पिटलमध्ये -१०, एमजीएम – वाशी – १, अपोलो ९, रिलायन्स- १, डी वाय पाटील – ५ , हीरानंदनी फोर्टिस-१, साई स्नेह दीप, एमजीएम बेलापूर- १ रुग्ण दाखल करण्यात आल्याचे समजते. यातील १४ रुग्ण नवी मुंबई मनपा हद्दीतील उर्वरित १५ रुग्ण हे नवी मुंबई बाहेरचे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जणांना दुसऱ्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तसेच ५ लोकांना आतापर्यंत उपचार करून घरी पाठवण्यात आले. नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामधील ३५ टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. १० मे च्या नंतर हे रूग्ण आढळून आले.