कल्याण डोंबिवलीत २९७ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

२२,४५२  एकूण रुग्ण तर ४४० जणांचा आतापर्यंत मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज २९७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०५ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २९७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २२,४५२  झाली आहे. यामध्ये ४६६७  रुग्ण उपचार घेत असून १७,३४५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ४३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या २९७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -५७,  कल्याण प.-७६,  डोंबिवली पूर्व -८७,  डोंबिवली प-३९,  मांडा टिटवाळा २८,  तर मोहना येथील  १० रुग्णाचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  ११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून, २ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, तर ९ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत