भिवंडी तालुक्यात ३, तर शहरात १ नवा कोरोना रुग्ण

भिवंडी : भिवंडी शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवस गणिक वाढत असून तालुक्यात ३ तर शहरात एक नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने भिवंडी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ वर पोहचली आहे .

 तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली ४२ वर

भिवंडी : भिवंडी शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवस गणिक वाढत असून तालुक्यात ३ तर शहरात एक नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने भिवंडी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ वर पोहचली आहे .
   भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या डोहाळे गावातील व्यक्ती सह जु नांदूरखी व गुंदवली या गावात प्रत्येकी एक रुग्ण कोरोना बाधित अधुळण आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांनी दिली असून तालुक्यातील रुग्णांची संख्या २९ झाली आहे तर ९ रुग्णांणी कोरोना वर मात केल्याने सध्या २० रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याचे सांगितले .
    तर भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मुंबई येथून निजामपुरा या भागात आलेली एक व्यक्ती कोरोना बाधित झाल्याची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली असून शहरातील रुग्णांची संख्या २८ वर पोहचली असताना एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यु झाला तर ५ जणांनी कोरोना वर मात केल्याने शहरातील २२ रुग्ण उपचारा साठी दाखल असल्याची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .