bhivandi accident

मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे भिवंडी बायपास रस्ता(thane -bhivandi bypass road)  निसरडा झाल्याने रात्री २ ते सकाळी ८ दरम्यान एकूण तीन ट्रक(three trucks accident) या निसरड्या रस्त्यावरून घसरून रस्त्या लगतच्या सुमारे वीस फूट खोल खाली घसरून पडले आहेत .

भिवंडी : हवामानातील बदलांमुळे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडविली. रिमझिम झालेल्या पावसाने रस्ते ओलेचिंब झाले. मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे भिवंडी बायपास रस्ता(thane -bhivandi bypass road)  निसरडा झाल्याने रात्री २ ते सकाळी ८ दरम्यान एकूण तीन ट्रक(three trucks accident) या निसरड्या रस्त्यावरून घसरून रस्त्या लगतच्या सुमारे वीस फूट खोल खाली घसरून पडले आहेत .

यामध्ये एक गॅस भरलेल्या टँकरचा समावेश असून सुदैवाने त्याची गळती झाली नाही ना कोण जखमी झाले आहे.  मात्र हे तिन्ही ट्रक व टँकर नाशिक वाहिनीवरील रस्त्याच्या कडेला पडले असल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करीत नसल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे.तसेच हे ट्रक वाहतुकीची वर्दळ कमी असताना दुपारनंतर क्रेनच्या सहाय्याने उचलून बाहेर काढणार असल्याची माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली आहे .