corona

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३०७ कोरोना रुग्णांची(corona patients) नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३०७ कोरोना रुग्णांची(corona patients) नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,७७३ झाली आहे. यामध्ये ४१८० रुग्ण उपचार घेत असून ३६,७७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-४७, कल्याण पश्चिम – १०४, डोंबिवली पूर्व ८२, डोंबिवली पश्चिम – ४९, मांडा टिटवाळा – १५, मोहना – ६, तर पिसवली येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.