दुचाकीला बेस्टची धडक-३५ वर्षीय महिला बसखाली आल्याने ठार, चालकावर गुन्हा दाखल

ठाण्यातून मुंबईच्या दिशेला दुचाकीवरून निघालेल्या दुचाकीला मुंबादेच जाणाऱ्या बेस्ट बसने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवर ३५ वर्षीय समीक्षा परब या खाली पडल्याने बेस्टच्या खाली सापडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

ठाणे : ठाण्यातून मुंबईच्या दिशेला दुचाकीवरून निघालेल्या दुचाकीला(two wheeler) मुंबादेच जाणाऱ्या बेस्ट बसने(best bus) मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवर ३५ वर्षीय समीक्षा परब या खाली पडल्याने बेस्टच्या खाली सापडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.(woman died in best bus accident) या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून बेस्ट बस चालक अनिल थोरात(४५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा थरार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आज संध्याकाळी ३५ वर्षीय महिला समीक्षा परब या महिलेला मुंबईच्या दिशेला दुचाकीवरून घेऊन जात असतानाच इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील गुरुद्वारच्या समोरील रस्त्याच्या बाजूला दुचाकीला बेस्ट बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या मृतक समीक्षा परब या खाली पडल्या आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसखाली सापडल्या. या विचित्र अपघातात समीक्षा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून नौपाडा पोलिसांनी बेस्ट चालक अनिल थोरात याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात प्रदीप सैम प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. नौपाडा पोलीस अधिक तपास करीत आहे.