कल्याण डोंबिवलीत ३६३ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

२०,६३३ एकूण रुग्ण तर ३७७ जणांचा आतापर्यंत मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ३६३  नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९  जणांचा मृत्यू झाला असून ४३७ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३६३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २०,६३३ झाली आहे. यामध्ये ५५६२ रुग्ण उपचार घेत असून १४,६९४  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ३७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३६३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -१०६,  कल्याण प.-७१,  डोंबिवली पूर्व -९१,  डोंबिवली प-५७,  मांडा टिटवाळा ६,  मोहना ३१, तर पिसवली येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  १६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून तसेच ८  रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.