कल्याण डोंबिवलीत ३६९ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णांची संख्या ५६७८ कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज एकाच दिवशी तब्बल ३६९ रुग्ण आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची

कोरोना रुग्णांची संख्या ५६७८

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज एकाच दिवशी तब्बल ३६९ रुग्ण आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. आजच्या या ३६९ रुग्णांमुळे कोरोना रुग्णांची संख्या  ५६७८ झाली आहे. या ५६७८  रुग्णांमध्ये ३३७२  रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २१९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १०७ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.