प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंब्रा येथील क्रिटीकेअर रुग्णालयाला अचानक आग लागली. बघता बघता या आगीनं पेट घेतला आणि तिथं दाखल असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याची लगबग सुरू झाली. रुग्णांना बाहेर काढण्याच्या घाईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांची अवस्था गंभीर होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. या धावपळीत त्यांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. 

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्छाद सुरू असताना हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या अपघातांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडत आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रामधील एका रुग्णालयात घडलेल्या एका घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ उडालीय.

    मुंब्रा येथील क्रिटीकेअर रुग्णालयाला अचानक आग लागली. बघता बघता या आगीनं पेट घेतला आणि तिथं दाखल असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याची लगबग सुरू झाली. रुग्णांना बाहेर काढण्याच्या घाईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांची अवस्था गंभीर होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. या धावपळीत त्यांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.

    क्रिटी केअर हे नॉन कोव्हिड रुग्णालय आहे. या ठिकाणी एकूण २६ जणांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते. घटनेनंतर तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. काही तासांतच अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं.

    रुग्णालयाच्या मीटर बॉक्समध्ये आग लागली आणि त्यानंतर ती पसरत गेल्याची माहिती मिळतेय. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलंय.