crime scene

सोने-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या उद्देशानेच ठाण्यातील बी. के. ज्वेलर्सचे(BK Jewellers) मालक भरत जैन यांची हत्या(Bharat Jain Murder Case) झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

    ठाणे : सोने-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या उद्देशानेच ठाण्यातील बी. के. ज्वेलर्सचे(BK Jewellers) मालक भरत जैन यांची हत्या(Bharat Jain Murder Case) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या हत्या प्रकरणातील सूत्रधारांना नौपाडा पोलिसांना(Naupada Police) मोठ्या कौशल्याने अटक केली आहे. यापैकी एक आरोपी जैन यांच्या परिचयाचा होता. त्यामुळे जैन यांना जिवंत सोडले तर आपले बिंग फुटेल, या भीतीपोटी त्यांनी ही हत्या केल्याची कबुली सूत्रधारांनी पोलिसांकडे दिली आहे.

    ठाण्यातील ज्वेलर्स भरत जैन (४३) यांचा मृतदेह २० ऑगस्ट रोजी कळवा, रेतीबंदर येथील खाडीत आढळला होता. मखमली तलाव येथील नीळकंठ सोसायटीत राहणार्‍या भरत जैन यांचे दगडी शाळेजवळील दत्त अपार्टमेंटमध्ये बी. के. ज्वेलर्स हे दुकान आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेले भरत घरी परतलेच नाही. १५ तारखेला त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. परंतु, भरत यांचा हात पाय बांधलेला मृतदेह ठाणे खाडीत सापडल्याने खळबळ उडाली होती. जैन यांची हत्या झाल्याचे स्पष्ट होत असल्याने आरोपींचा शोध उपायुक्त अविनाश अंबूरे यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाड्याचे पोलिस निरीक्षक अविनाश सोंडकर, पीएसआय लबडे आणि पोटे यांचे पथक घेत होते.

    पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले होते. त्या आधारे तपास करत जैन यांना घेऊन जाणार्‍या ओला कारचा चालक आणि त्याच्या सहकार्‍याला पोलिसांनी अटक केली होती. जैन यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह हातपाय बांधून खाडीत टाकल्याची तसेच दुकानातील दीड लाख रुपयांचे चांदिचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली होती. परंतु, या हत्येचे दोन्ही मुख्य सूत्रधार पसार झाले होते. नौपाडा पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून या दोघांच्या हाती बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी एक जण कळवा तर दूसरा खोपट परिसरात राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी एक आरोपी हा जैन यांच्या परिचयातला होता. अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश आंबुरे दिली.